गोंडवाना विद्यापीठ संचालित केंद्राअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याअंतर्गत पर्यटनास भरघोस चालना
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संचालित ट्रायसेफ नवउद्योजक केंद्राअंतर्गत पंकज नंदगिरीवार यांनी पर्यटन आधारित सोबाय टुरिझम नवउद्योजक कंपनीची स्थापना केलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटनाला एक योग्य दिशा देण्याकरीता जिल्ह्यातील युवकांनी सुरु केलेले उपक्रम म्हणजे सोबाय टुरिझम होय.
सदर स्टार्टअपव्दारा जिल्ह्यातील निसर्गरम्य स्थळे, जंगल सफारी, आदिवासी पर्यटन, धार्मिक व सामाजिक पर्यटन इत्यादीवर आधारित पॅकेज टुर्स अत्यल्पदरात उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
सदर स्टार्टअप कंपनीची वैशिष्ट्यता म्हणजे गडचिरोली जिल्ह्याअंतर्गत ओळख नसलेल्या शुध्द व अक्षत पर्यटन स्थळांचा समावेश केलेला आहे. जेणेकरुन, जिल्ह्याअंतर्गत पर्यटनाला चालना देऊन स्थानिक आर्थिक विकासाला हातभार लावता येईल. याअनुषंगाने, ट्रायसेफ नवउद्योजक केंद्राचे संचालक प्रा मनिष द उत्तरवार यांनी सदर कंम्पनीतर्फे येणाऱ्या काळात पॅकेज टुर्सचे https://tribeetours.in या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग करुन जिल्ह्याअंतर्गत असलेल्या अमर्याद व निसर्गरम्य पर्यटनाचा लाभ घ्यावा, असे जाहीर आव्हान केले आहे.