“स्वारातीम” ज्ञानतीर्थ-२०२४ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाचे थाटात उद्घाटन
स्वतःला स्वीकारण्याची तयारी ठेवल्यास यशाचा मार्ग मिळतो – सिने कलावंत प्राजक्ता हनमघर
नांदेड : मी ज्यांच्यामुळे घडले त्यांच्याबद्दल नेहमीच कर्तज्ञ असते. माझी ओळख मराठवाड्याची मानस कन्या म्हणून आहे. याचा मला खूप अभिमान वाटतो. मराठवाडा संतांची, समतेची, अध्यात्माची भूमी आहे. मराठवाड्याला धार्मिक सांस्कृतिक साहित्याचा मोठा वारसा लाभलेला आहे. स्पर्धेतून यश-अपयश मिळतच असते. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला स्वीकारण्याची तयारी ठेवा, असे प्रतिपादन बुल सिनेकलावंत तथा कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम प्राजक्ता हनमघर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोगी सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी विष्णुपुरी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ अंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ एम बी कोकरे, डॉ प्रशांत पेशकार, प्र-कुलसचिव डॉ डी डी पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखा अधिकारी मोहम्मद शकील, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नरेंद्र दादा चव्हाण, डॉ डी एन मोरे, डॉ सूर्यकांत जोगदंड, डॉ संतराम मुंढे, डॉ सुरेखा भोसले, इंजि नारायण चौधरी, हनुमंत कंधारकर, डॉ सिंकु कुमारसिंह, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव, युवक महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष प्राचार्य डॉ बालाजी गिरगावकर, प्राचार्य सुनील हंबर्डे, डॉ सोमनाथ पचलिंग, सल्लागार समिती सदस्य डॉ मामा जाधव, डॉ सुनील व्यवहारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ मल्लिकार्जुन करजगी, माजी क्रीडा संचालक डॉ राजेश्वर दुडूकनाळे, डॉ ज्ञानदेव राऊत, डॉ सिद्धार्थ टाकणकर, डॉ संगीता अवचार, डॉ संदीप काळे, अधिसभा सद्स्य, विद्या परिषद सदस्य, डॉ विजय भोपळे, डॉ एम आर जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ अशोक कदम यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ सूर्यप्रकाश जाधव म्हणाले की, या युवक महोत्सवात विद्यापीठ परिक्षेत्रातील संघाने वेगवेगळ्या १०० कला प्रकारात नोंद केली असून १५०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. युवक महोत्सवामध्ये भारतीय संविधान, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यासह मराठवाड्यातील कला संस्कृती या विषयांना महत्त्व देण्यात आले आहे.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ मनोहर चासकर म्हणाले की, युवकाकडे जे कला कौशल्य आहे त्या संधी मिळवण्यासाठी युवक महोत्सव प्लॅटफॉर्म आहे. आगामी इंद्रधनुष्य युवक महोत्सवात कलावंतांनी विद्यापीठाचा नावलौकिक वाढवावा, असे ते म्हणाले.
सूत्रसंचालन डॉ विश्वाधार देशमुख यांनी तर आभार डॉ प्रवीण मुळीक यांनी मानले.