एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या पदवीप्रदान समारंभात ४८२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

डॉ रमेश डेका, कुलपती कमलकिशोर कदम यांची प्रमुख उपस्थिती

छत्रपती संभाजीनगर : एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या पदवी अभ्यासक्रमांच्या एमबीबीएस, बीपीटी, बिपीओ, बीएस्सी अलाईड हेल्थ सायन्सेस तर पदव्युत्तरच्या एमएससी मेडिकल/ एएचएस/एमएचए, पीएचडी अभ्यासक्रमांच्या ४८२ विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात झालेल्या पदवीप्रदान समारंभात पदवी प्रदान करण्यात आली.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) माजी संचालक डॉ रमेश डेका या पदवी प्रदान सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते तर महात्मा गांधी मिशन ट्रस्टचे अध्यक्ष आणि कुलपती कमलकिशोर कदम, उपाध्यक्ष डॉ पी एम जाधव, सचिव अंकुशराव कदम, एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसचे कुलगुरू डॉ शशांक दळवी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमरदीप कदम, अशोक पाटील, प्रा ममिला रवी शंकर, डॉ प्रवीण शिनगारे, अधिष्ठाता डॉ प्रभा दसिला, अधिष्ठाता डॉ जी एस नारशेट्टी, अधिष्ठाता डॉ राजेंद्र बोहरा, कुलसचिव डॉ राजेश गोयल, परीक्षा नियंत्रक डॉ परिणीता सामंत, उपकुलसचिव डॉ राजेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी, बोलताना डॉ डेका म्हणाले, सर्वप्रथम मी आपल्या सर्व डॉक्टरांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. आपण खूप भाग्यशाली असून आज आपल्याला एमजीएमसारख्या देशातील एका नामांकित विद्यापीठातून पदवी प्राप्त झालेली आहे. आपल्या आयुष्यातील आजचा हा एक आनंददायी दिवस आहे. आपल्या विद्यापीठाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे नाव आहे.

Advertisement

आपण आपल्या अभ्यासात प्रचंड मेहनत घेतली असून त्या मेहनतीतून आजचा दिवस आपण पाहत आहात.आज ही आपल्या करियरची सुरूवात आहे. आज आपण खूप मोठी जबाबदारी घेऊन या क्षेत्रात येत आहेत. डॉक्टर म्हणून काम करीत असताना देशाची आरोग्य व्यवस्था, पेशंट सुरक्षितता, तत्काळ उपचार,  हे आपले प्रधान्यक्रम असून आपल्या क्षेत्रात नैतिकता जपत कार्यरत राहायला हवे. रुग्णसेवा करीत असताना आपण आपल्या स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत निरोगी राहणेही तितकेच आवश्यक आहे. आपण आरोग्य क्षेत्रात जगाचे नेतृत्व करणारे उद्याचे नेते असून आपण आपला दृष्टिकोण हा रुग्णकेंद्रित ठेवाल, असा विश्वास डॉ. डेका यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी बोलताना कुलपती कमलकिशोर कदम म्हणाले, आपल्या आयुष्यात आपण काहीतरी मिळविल्याचा आणि आपल्या पालकांना आपल्यावर अभिमान असण्याचा आजचा हा दिवस आहे. जगामध्ये भारताइतके स्वस्त औषधे कुठेही मिळत नसून आज जगभरात आपण औषधे निर्यात करतो. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर महिला व पुरूषांचे सरासरी आयुर्मान अत्यंत कमी होते आज ते वाढले असून याचे सर्वस्वी योगदान आपल्यासारख्या तरुण डॉक्टरांचे आहे. आपण या क्षेत्रात उत्तम आणि दर्जेदार काम कराल या विश्वासासह आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो.

पदवीच्या विविध अभ्यासक्रमांच्या पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

एमबीबीएस : २४५

बीपीटी : १५२

बीपीओ : ०१

बीएस्सी ( एएचएस ) : १२

पदव्युत्तर पदवीच्या विविध अभ्यासक्रमांच्या पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे.

एमएस्सी एमएड/एएचएस/एमएचए : ६८

पीएच.डी :  ४

पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळविणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ५३१ असून आज झालेल्या पदवी प्रदान सोहळ्यात ४८२ विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे पदवी प्रदान करण्यात आली.

११ विद्यार्थी सुवर्ण आणि कुलपती पदकाचे मानकरी

विविध अभ्यासक्रमातून प्राविण्य मिळवणाऱ्या तसेच उत्तम कामगिरी करणाऱ्या ११ विद्यार्थ्यांना या सोहळ्यात सुवर्ण तसेच कुलपती पदकाने सन्मानित करण्यात आले. केगान मिरिंडा या विद्यार्थिनीने २ सुवर्ण पदके प्राप्त केली.

सुवर्ण तसेच कुलपती पदकाने सन्मानित विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत.

१. तान्या मंधाना

२. केगान मिरिंडा

३. आकांक्षा रसाळ

४. एस.खांडेपारकर रघुवीर श्रीराम

५. लक्षित शाह

६. मनाली सरकार

७. दृष्टी पटेल

८. चयन भट्टाचार्य

९. करिना चौधरी

१०. झील मिथानी 

या कार्यक्रमाचे प्रास्तविक कुलगुरू डॉ शशांक दळवी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अनुप्रिया महर्षि यांनी केले. दीपप्रज्वलन, सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि सांगता राष्ट्रगीताने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page