सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालयात पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न
नागपूर : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संचालित सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालय नागपूर येथे बेसिक बीएससी नर्सिंगच्या १५ व्या बॅचचा तसेच पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंगच्या ८ व्या बॅचचा पदवीदान समारंभ २९ एप्रिल 202५ रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मीरा कडबे, निर्देशक तरुण भारत नागपूर, डॉ मनीषा शेमबेकर, व्यवस्थापकीय संचालक, वरिष्ठ सल्लागार भूलतज्ज्ञ, ओमेगा हॉस्पिटल, नागपूर तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे स्थानीय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीकांत चितळे, श्रीकांत गाडगे, सुरेखा सराफ हे उपस्तित होते.

पदवीधरांच्या प्रास्ताविक भाषणात मीरा कडबे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचा प्राचार्या डॉ रूपा वर्मा यांनी पदवीधर विद्यार्थिनींना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्या दिल्या. या कार्यक्रमामध्ये संस्थेच्या विविध नामांकित महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, प्रतिष्ठित रुग्णालयातील कर्मचारी परिचारिका तसेच हे उपस्थित होते. या वर्षी डॉ शेंबेकर सर्वोत्कृष्ट शैक्षणिक पुरस्कार, आणि डॉ मनीषा शेंबेकर सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रमेतर उपक्रम पुरस्कार हे दोन नवीन रोख पुरस्कार विद्यार्थिनींना देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका गुजर आणि स्नेहा पिंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन तक्षशीला मेश्राम यांनी केले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ रूपा वर्मा यांचा मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने कठोर परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वी झाला.