राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे कुलगुरू प्रा डॉ प्रकाश महानवर यांनी केले स्वागत
सोलापूर : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यासाठी सोलापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ प्रकाश महानवर यांनी राज्यपालांचे स्वागत केले.
त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे कुलगुरू प्रा महानवर यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेऊन विद्यापीठाची माहिती त्यांना देत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.