अमरावती विद्यापीठात अनुकंपातत्वावर नियुक्तीचे शासन आदेश वितरण सोहळा 9 मार्च रोजी

पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार शासन आदेशाचे वितरण

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील अनुकंपातत्वावर नियुक्तीचे शासन आदेश वितरण सोहळा कार्यक्रमाचे शनिवार 9 मार्च, 2024 रोजी विद्यापीठ परिसरातील दृकश्राव्य सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य तथा जिल्ह्राचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या शासन आदेशाचे वितरण होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषविणार असून आ. सर्वश्री किरण नाईक, प्रवीण पोटे, रवी राणा, धिरज लिंगाडे, राज्यसभा सदस्य अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आ सुलभाताई खोडके, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
तरी या कार्यक्रमाला विद्यापीठ प्राधिकारिणी सदस्य, सर्व शैक्षणिक व प्रशासकीय अधिकारी, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com