महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सद्भावना दिन उत्साहात साजरा

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी स्व राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, डॉ संदीप कडू, एन व्ही कळसकर, डॉ देवेंद्र पाटील, डॉ सुनिल फुगारे, महेंद्र कोठावदे, ब्रिग सुबोध मुळगुंद स्व राजीव गांधी यांना अभिवादन केले.

Advertisement

याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी स्व राजीव गांधी यांच्या कार्याची माहिती व सद्भावना दिनाची उपस्थितांना शपथ दिली. याप्रसंगी कर्नल वरुण माथूर, राजेंद्र शहाणे, बाळासाहेब पेंढारकर, डॉ स्वाती जाधव, डॉ मानसी हिरे, प्रशांत पवार, अजित डेरे, सचिन बोरसे, अजांबर गावंडे, उल्हास कुलकर्णी आबाजी शिंदे, विनायक ढोले, पुष्कर तÚहाळ, कृष्णा भवर, विकास हांडोरे, अर्जुन नागलोत, सुरेश पुजारी, घनःश्याम घनगर, प्रशांत वाकचौरे, शांताराम गुंजाळ, दिलीप राजपूत आदी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page