यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सद्भभावना दिन साजरा
नाशिक : २० ऑगस्ट हा दिवस माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती. भारतात दरवर्षी हा दिवस ‘सद्भावना दिन’ म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय एकात्मता, शांतता आणि सार्वजनिक सौहार्दासाठी ह्या दिवशी शपथ घेतली जाते.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात सद्भभावना दिनानिमित्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांनी सद्भभावना दिन प्रतिज्ञनेचे वाचन केले, त्यानुसार विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनी पुढील प्रमाणे शपथ घेतली.
“मी अशी प्रतिज्ञा करतो की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो की, मी आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गाने सोडवीन.”कार्यक्रमास कुलसचिव दिलीप भरड, वित्त अधिकारी, डॉ गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.