गोंडवाना विद्यापीठात दोन दिवसीय शिक्षक क्रीडा व कला महोत्सव “कलादर्पण – 2024” चे आयोजन

गडचिरोली : शिक्षकांमधील कलागुणांना वाव देऊन त्यांच्यामध्ये खेळ आणि कलेप्रती उत्साह निर्माण व्हावा, याकरीता गोंडवाना विद्यापीठातील तसेच संलग्न महाविद्यालयातील शिक्षकांकरीता दि. 19 ते 20 मार्च 2024 या कालावधीत गोंडवाना विद्यापीठ परिसरात दोन दिवसीय शिक्षक क्रीडा व कला महोत्सव “कलादर्पण-2024” चे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, दि. 19 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या हस्ते पार पडणार आहे.

Gondwana University GUG Gadchiroli

कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ अनिल हिरेखन, मानव विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ अमुदाला चंद्रमौली, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ अनिल चिताडे तसेच नागपूर, हार्मोनि इव्हेंटचे संचालक राजेश समर्थ, सुप्रसिद्ध गायक प्रफुल सांगोळे आणि कलर्स उपविजेती, स्वर्ण स्वर भारत, इंडियन आयडल फेम स्वस्तिका ठाकूर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

सदर शिक्षक क्रीडा व कला महोत्सवाचा समारोप बुधवार, दि. 20 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. समारोपीय कार्यक्रमाला सिंदेवाहीचे सुप्रसिद्ध नाट्यकलावंत प्रा डॉ शेखर डोंगरे, वडसा येथील नाट्यलेखक, दिग्दर्शक व नाट्यकलावंत युवराज प्रधान, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ अनिता लोखंडे यांची उपस्थिती असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com