गोंडवाना विद्यापीठाचा ‘लर्न कोच’ सॉफ्टवेअर कंपनीसोबत सामंजस्य करार
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्यावतीने आज दिनांक २८ नोव्हेंबर रोजी लर्न कोच च्या NAAC मान्यता सॉफ्टवेअरवर NAAC कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. NAAC प्रक्रिया सुलभ करण्यासाठी लर्न कोच या सॉफ्टवेअर कंपनीसोबत या कार्यशाळेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, आयक्यूएसी संचालक डॉ. धनराज पाटील, ई समर्थ प्रणाली चे नोडल अधिकारी प्रशांत सोनावणे यांच्यासह विविध पदव्युत्तर शिक्षण विभागाचे प्रमुख, सहा. प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यशाळेत लर्नकोचचे संस्थापक आणि सीईओ मनीष तिवारी यांनी नवीन बायनरी प्रणाली, नवीन मानदंड आणि संपूर्ण डिजिटायझेशनसह विकसित होणारी NAAC ओळख प्रणाली हाताळण्यासाठी सॉफ्टवेअर कसे तयार आहे हे दाखवून दिले.
अधिकाऱ्यांनी NAAC मान्यता सुरळीत आणि त्रासमुक्त करण्यासाठी लर्न कोच NAAC सॉफ्टवेअरबद्दल समाधान व्यक्त केले.
गोंडवाना विदयापीठाच्या इंटर्नल क्वालिटी ॲश्युरन्स सेल (IQAC) मध्ये प्राध्यापकांना मोठ्या प्रमाणात डेटा प्रविष्ट करावा लागतो. हे काम सोपे करण्यासाठी ‘लर्न कोच’ने एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे, ज्याद्वारे विद्यापीठातील प्राध्यापक किंवा कर्मचारी कधीही कोठूनही सहजपणे डेटा एन्ट्री करू शकतील. कोणत्याही विद्यापीठातील प्राध्यापक त्यांच्या शैक्षणिक कार्याच्या नोंदी फक्त IQAC मध्ये ठेवतात. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन (UGC) कोणत्याही विद्यापीठाला IQAC च्या आधारे चांगले रँकिंग देते. यामध्ये चांगल्या रँकिंगमुळे विद्यापीठाची कीर्ती येते. विद्यापीठातील शिक्षकांनी गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामावर प्रकाश टाकणे आणि त्यातून होणारे शैक्षणिक फायदे आता सहज नोंदवता येणार आहेत. त्यामुळे प्राध्यापकांना त्यांच्या अध्यापन कार्यावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल आणि विद्यापीठ विकासाची शिडी चढत राहील. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.