विद्यार्थ्यांच्या झाडीबोली कलेने रंगला गोंडवाना विद्यापीठाचा परिसर
झाडीबोली नाट्यसंमेलनातून विद्यार्थी प्रतिभेला मिळाला मुक्त वाव
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग आणि झाडीबोली साहित्य दालन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झाडीबोली नाट्य संमेलनात विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी झाडीबोली भाषेतील नाट्यकला, लोककला आणि अभिनयाची अप्रतिम मेजवानी सादर केली.
उद्घाटन सत्रात झाडीबोली अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांची मुलाखत प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी घेतली. या संवादानंतर पारंपरिक कलाप्रकारांनी वातावरण रंगवले.
संमेलनात झाडीबोली एकांकिका, एकपात्री नाट्यछटा आणि लोककला या तीन प्रमुख स्पर्धा घेण्यात आल्या. ग्रामीण संस्कृती, सामाजिक प्रश्न आणि लोकजीवनाचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या सादरीकरणांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.

विजेतेपदाचा मान
- एकांकिका स्पर्धा:
- प्रथम पारितोषिक – कला व वाणिज्य महाविद्यालय, भिसी (एकांकिका शेत शिवार) – ₹6000 रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
- द्वितीय पारितोषिक – आदर्श महाविद्यालय, गडचिरोली (मीतर) – ₹3000 रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
- उत्तेजनार्थ – राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, सावली (व्यथा संसाराची) – स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
- एकपात्री अभिनय:
- प्रथम – सचिन भरडे, आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूर – ₹2000 रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
- द्वितीय – श्रुती निकुरे, सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर – ₹1000 रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
- उत्तेजनार्थ – क्रांतिवीर सिडाम जनता महाविद्यालय, चंद्रपूर – स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
- झाडीबोली लोककला:
- प्रथम – आदर्श पदवी महाविद्यालय, गडचिरोली – ₹2000 रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
- द्वितीय – वाय.एस. पवार महाविद्यालय, नेरी (चंद्रपूर) – ₹1000 रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
- उत्तेजनार्थ – आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूर – स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
मान्यवरांची उपस्थिती
समारोपीय व बक्षीस वितरण सोहळ्यास मानव विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम खंडारे, मराठी विभाग प्रमुख डॉ. सविता गोविंदवार, झाडीबोली नाट्यसंमेलन समन्वयक डॉ. नीलकंठ नरवाडे, डॉ. हेमराज निखाडे, डॉ. धैर्यशील खामकर तसेच परीक्षक नाट्यकलावंत जगदीश नंदुरकर, डॉ. संजय लाटेलवार आणि डॉ. राजकुमार मुसने उपस्थित होते. डॉ. श्याम खंडारे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

या संमेलनाने झाडीबोली भाषेच्या संवर्धनासोबतच स्थानिक लोककला व नाट्य परंपरेला नवी दिशा मिळाल्याचे आयोजकांनी नमूद केले.
