सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे १५ सप्टेंबर रोजी आयोजन

विशेष कार्य केलेल्या माजी विद्यार्थ्यांना उत्कृष्टतेचा पुरस्कार देणार

बीड : आदर्श शिक्षण संस्था संचालित सोनाजीराव क्षीरसागर वैद्यकीय महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवाचे १५ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजन केले आहे. महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवात डीएचएमएस, बीएचएमएस, एम डी आणि पीएचडीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्याचे आयोजन केले आहे.

होमिओपॅथीमध्ये विशेष कार्य केलेल्या या महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उत्कृष्टतेचा पुरस्कार देण्यात येईल.

महाविद्यालयाच्या आनंदाच्या, अभिमानाच्या आणि गौरवाच्या क्षणात महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण महाविद्यालयाचे सल्लागार डॉ अरुण भस्मे, प्राचार्य डॉ महेंद्र गौशाल यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com