जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीसाठी गोदावरी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी
जळगाव : जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एच आय व्ही/एड्सविषयक जनजागृती वाढवण्यासाठी युवा युवतींमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे प्रभात फेरी मध्ये सहभाग नोंदविला.
प्रभात फेरीमध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग नोंदविला आणि एड्सविषयक माहिती तसेच प्रतिबंधात्मक उपाय यावर जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी विविध स्थानिक ठिकाणी फलक आणि पोस्टरसह एड्सविषयक संदेश प्रसारित केला. यावेळी विद्यार्थ्यांना समाजातील लोकांमध्ये जागरूकता पसरविण्याची महत्त्वाची भूमिका निभावण्यास प्रेरित करण्यात आले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आणि एड्सच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपली भूमिका प्रभावीपणे पार पाडावी, असा संदेश देण्यात आला.