गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरी

जळगाव : गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी विविध रंगांच्या रांगोळ्यांनी परिसर सजवून, कंदील व दिव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळवला.

या सणाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी आपापली कला सादर करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पारंपारिक वातावरणात लक्ष्मीपूजन करून दिवाळी सण साजरा करण्यात आला. सर्वांनी एकत्र येऊन आनंद घेतल्याने महाविद्यालयाचा परिसर दिवाळीच्या उत्साहाने भरून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com