कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांनी संपादीत केलेली आंतरराष्ट्रीय ख्यातीची तीन पुस्तके ज्ञानस्त्रोत केंद्राला भेट
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांनी संपादीत केलेली आंतरराष्ट्रीय ख्यातीची तीन पुस्तके विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्राला देणगी स्वरुपात देण्यात आली. यातील एका पुस्तकाचे औपचारीक प्रकाशन व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सोमवारी करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या स्प्रिंगर नेचर प्रकाशन सिंगापूरच्या वतीने ही पुस्तके प्रकाशित करण्यात आलेली आहेत. एंडोफाईटस : पोटेन्शिअल सोर्स ऑफ कंपाऊंडस ऑफ कमर्शिअल ॲण्ड थेरेप्युटिक ॲप्लिकेशन तसेच नॅचरल प्रोडक्टस ॲण्ड एनजाईम इनहिबिटर : ॲन इंडस्ट्रीअल प्रेस्पेक्टीव्ह या दोन पुस्तकांचे संपादन प्रा व्ही एल माहेश्वरी व प्रा रवींद्र पाटील (शिरपूर) यांनी केलेले आहे. या शिवाय तिसरे पुस्तक एपोसायनासी प्लांटस : एथनोबॉटनी, फायटोकेमिस्ट्री, बायोएक्टिव्हिटी ॲण्ड बायोटेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस हे पुस्तक हे पुस्तक प्रा रवींद्र पाटील, मोहिनी पाटील व प्रा व्ही एल माहेश्वरी यांनी संपादित केले आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना ही पुस्तके अभ्यासासाठी पुरक ठरणार आहेत. विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्रासाठी ही पुस्तके प्रा व्ही एल माहेश्वरी यांच्याकडून सोमवारी देण्यात आली.
त्या आधी एपोसायनासी प्लांटस या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, प्रा अनिल डोंगरे, प्रा एस टी भूकन, प्रा सतिश कोल्हे, प्राचार्य संजय सुराणा, प्रा शिवाजी पाटील, प्रा सुरेखा पालवे, प्रा नितीन झाल्टे, डॉ पवित्रा पाटील, डॉ विनोद पाटील, सीए रवींद्र पाटील, प्रा योगेश पाटील उपस्थित होते.