जीएच रायसोनी कॉलेजचा वार्षिक स्नेह मेळावा अंतरागनी-2024 उत्साहात साजरा

पुणे : जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटचा वार्षिक स्नेह मेळावा, “अंतरागिनी 2024”, विद्यार्थ्यांचा समृद्ध वारसा दर्शवणारी प्रतिभा आणि विविधतेच्या रंगीत प्रदर्शन सादरीकरणाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. त्यात पारंपारिक नृत्य, स्किट्स आणि समकालीन संगीत सादरीकरणाचा समावेश होता. या कार्यक्रमात मिसमॅच डे आणि पारंपारिक पोषाक दिवस साजरा करण्यात आला. बक्षीस वितरण सुप्रसिद्ध कीबोर्ड वादक सोहम देशपांडे आणि पराग भिरड यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्याच्या यशाचे कौतुक केले. या दोघांनी कीबोर्डवर मेलडी सादर केली.

कॅम्पस डायरेक्टर डॉ आर डी खराडकर यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यांनी शैक्षणिक, नवोपक्रम आणि संशोधनातील यशासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे कौतुक केले. दरम्यान, फॅशन शो ने विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना एकत्र आणून विविधतेतील एकता साजर केली आणि महाविद्यालयीन समुदायामध्ये सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि समजूतदारपणाला प्रोत्साहन दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ अमोल पोटे व डॉ सुधीर हाटे यांनी पुढाकार घेतला. रायसोनी ग्रुपचे अध्यक्ष सुनील रायसोनी आणि रायसोनी ग्रुपचे कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी यांनी कार्यक्रमाच्या चांगल्या आयोजनाबद्दल प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com