श्री बंकटस्वामी महाविद्यालयात भूगोल दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

इस्रो दुरस्त अध्ययन केंद्राचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न.

बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील भूगोल विभागातर्फे भूगोल दिन साजरा करण्यात आला. या निमित्त इस्रो दुरस्त अध्ययन केंद्र प्रमाणपत्र वितरण, वसुंधरा मंडळाचे उद्घाटन आणि पर्यावरण भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा विभाग प्रमुख डॉ.शिवाजी मोरे, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जनविकास महाविद्यालय बनसारोळा येथील भूगोल विभाग प्रमुख तथा भूगोल अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. हरिदास पिसाळ तसेच प्रमुख पाहुणे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख तथा भूगोल अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.अशोक डोके, इस्रो दुरस्त अध्ययन केंद्राचे समन्वयक तथा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.प्रकाश कोंका,भूगोल विभागातील डॉ. जे.डी.चव्हाण आणि वसुंधरा मंडळाचे अध्यक्ष कु. पूजा हटवटे आदी व्यासपीठावर होते.


प्रमुख पाहुणे तथा उद्घाटक डॉ.पिसाळ यांनी आपल्या मार्गदर्शनात भूगोल दिन का साजरा केला जातो त्याची औचित्य काय आणि उत्तरायण आणि दक्षिणायन याची माहिती सांगून भूगोल दिनाचे महत्त्व सांगितले. महाराष्ट्रातील ख्यातनाम भूगोल तज्ञ प्राध्यापक चंद्रकांत धोंडीराज देशपांडे ज्यांच्या जयंती निमित्त भूगोल दिन साजरा केला जात असल्याचे सांगून त्यांच्या भूगोल विषयातील योगदानावर प्रकाश टाकला.त्यासोबतच भूगोल विषयांमध्ये अलीकडच्या काळामध्ये कशाप्रकारे तंत्रज्ञानाचा वापर वाढत गेला आहे आणि ते तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करून विविध रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांनी मिळवाव्यात असे आवाहन केले.

Advertisement


प्रमुख पाहुणे डॉ.अशोक डोके यांनी मार्गदर्शन करताना पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन संदर्भात सजग असणे खूप गरजेचे आहे त्यासोबतच भूगोलाच्या विद्यार्थ्यांनी समाजात इतर घटकांना पर्यावरण संवर्धन पाण्याची बचत करण्यासंदर्भात जाणीव जागृती निर्माण केली पाहिजे असे मत त्यांनी यावेळेस व्यक्त केले.


अध्यक्षीय समारोप करत असताना डॉ. शिवाजी मोरे यांनी अस्थिर पृथ्वी आणि चंचल मानव यांच्या सहसंबंधांचा अभ्यास म्हणजे भूगोल असल्याचे सांगून भूगोलाच्या अध्ययनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
सदरील कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पर्यावरण भित्तीपत्रकाचे प्रकाशन आणि वसुंधरा मंडळाचे उद्घाटन त्यासोबतच इसरो दुरस्त अध्ययन केंद्राचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पर्यावरणीय ज्वलंत समस्येवर रांगोळी प्रदर्शन भरवले या रांगोळी प्रदर्शनातून एक पर्यावरणीय संदेश देण्याचे काम केले असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रकाश कोंका यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा मंडळाचे अध्यक्ष कुमारी पूजा हटवटे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. जे डी चव्हाण सर यांनी केले. याप्रसंगी भूगोल विषयातील संशोधक विद्यार्थी, वसुंधरा मंडळाचे उपाध्यक्ष साक्षी रुपनर, सचिव रोहित गायकवाड, सदस्य रोहन गायकवाड , प्रियंका गिरी, संपादक आरती जंगले,अक्षय जाधव, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page