माध्यमशास्त्र प्रशाळेतील विद्यार्थी गौरव हरताळे यांचे जनसंवाद आणि पत्रकारिता विषयात सेट परीक्षेत यश

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेतील एमए एमसीजे २०२२-२३ बॅचचा विद्यार्थी गौरव हरताळे यांनी जनसंवाद आणि पत्रकारिता विषयात सेट परीक्षेत यश संपादन केले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्यावतीने ७ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन जनसंवाद आणि पत्रकारिता विषयात गौरव हरताळे हे उत्तीर्ण झाले आहे. गौरवला माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा डॉ सुधीर भटकर, डॉ गोपी सोरडे, डॉ सोमनाथ वडनेरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com