जी एच रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीचा यंग इंडियन्स कंपनीसोबत सामंजस्य करार
पुणे : जी एच रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी पुणे ने यंग इंडियन्स युवा चॅप्टर सुरू करण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) च्या पुढाकाराने उद्योजक, यंग इंडियन्स सोबत सामंजस्य करार केला. विद्यापीठात आयोजित एका समारंभात यंग इंडियन्स पुणे चॅप्टरचे अध्यक्ष श्री. राघवेंद्र भट आणि रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. यू. खरात यांनी औपचारिकपणे या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, उद्योजकता आणि नागरी जबाबदारी वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

यावेळी परनेल टेक्नाॅलाॅजीचे संस्थापक योगेश देसाई, बॉटम-लाइनचे संस्थापक शाहबाज खान, स्नोव्ह संस्थापक समीर धामणगावकर, इनोव्हेल्प्सचे सहयोगी रोहन ट्युरिअर, बिझसोल फायनान्शियलचे संस्थापक श्री. अदवैत वेन्कीटाचलम, सीआयआय पुणेच संचालक विशाल लाल, अभिषेक दुबे आणि श्री. प्रवण सोनी, अधिष्ठाता डॉ. राहत खान, डॉ. गरिमा चौबे, डॉ. मिनाक्षी आणि डॉ. सोनाली पी. रंगदाले यावेळी उपस्थित होते.
राघवेंद्र भट म्हणाले की, रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी पुणे सोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. यी युवा चॅप्टर हे विद्यार्थ्यांना राष्ट्र उभारणीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी, नेतृत्व क्षमता विकसित करण्यासाठी आणि अर्थपूर्ण सामुदायिक सेवेत सहभागी होण्यासाठी एक जीवंत व्यासपीठ असेल.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. यू. खरात यांनी सांगितले की, हे सहकार्य विद्यापीठाच्या समग्र शिक्षण प्रदान करण्याच्या ध्येयाशी पूर्णपणे सुसंगत आहे. यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणाच्या पलीकडे जाणारे अमूल्य अनुभव मिळतील.