जी एच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मतदार जनजागृती’ उपक्रम उत्साहात संपन्न


स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांना दिली शपथ

पुणे : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट आणि जी एच रायसोनी वरिष्ठ महाविद्यालय, पुणे येथे मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. शिरूर, पुणे येथील स्वीप नोडल अधिकारी प्रीतम पाटील यांनी लोकशाहीत मतदारांच्या सहभागाचे महत्त्व या विषयावर अभ्यासपूर्ण सत्रात उपस्थितांना संबोधित केले.

कार्यक्रमाच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये सहभागींना त्यांच्या मतदानाच्या अधिकारांबद्दल शिक्षित करणे, निवडणूक प्रक्रिया समजून घेणे आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी माहितीपूर्ण मतदानाच्या भूमिकेवर जोर देणे समाविष्ट होते.

Advertisement

यावेळी जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंटचे कॅम्पस संचालक डॉ आर डी खराडकर, जी एच रायसोनी वरिष्ठ महाविद्यालय, पुणेचे संचालक डॉ एच आर कुलकर्णी, कुलसचिव सुजितकुमार कारंडे आणि विविध विभागप्रमुख उपस्थित होते. कॅम्पस संचालक डॉ आर डी खराडकर, यांनी विद्यार्थ्याने मतदानाचे कर्तव्य बजावावे, असे प्रास्ताविकमधून सांगितले. तर जी एच रायसोनी सीनियर महाविद्यालय, पुणेचे संचालक डॉ एच आर कुलकर्णी यांनी प्रत्येक मतदाराचे मत हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

स्वीप नोडल अधिकारी प्रीतम पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ‘वोटर हेल्पलाइन अॅप’ बद्दल माहिती दिली. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याच्या आणि इतरांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी दिली.

या कार्यक्रमात बीबीए, बीसीए आणि बीसीएस अभ्यासक्रमातील 103 विद्यार्थ्यांसह 27 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असे एकुण 130 लोकांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल एम वाघोले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page