जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
पुणे : जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच पार पडला. यावेळी इंजीनिअरिंगच्या विविध बॅचमधील पदवीधरांनी हजेरी लावत आपल्या आठवणीना उजाळा दिला. या मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना जुने मित्र, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाची सुरुवात जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पुणे चे संचालक डॉ आर डी खराडकर यांच्या स्वागत भाषणाने झाली, ज्यांनी महाविद्यालयाच्या कामगिरीवर प्रकाश टाकत माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाची माहिती दिली.
कॉलेजने उत्कृष्ट कामगिरीबद्दल नऊ माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. प्रमुख माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा व्यावसायिक प्रवास आणि महाविद्यालयाचा त्यांच्या यशावर झालेला प्रभाव सांगितला. माजी विद्यार्थ्यांनी सध्याचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन करणारा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले. दरम्यान माजी विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी स्नेह भोजनाचा अस्वाद घेतला.
या कार्यक्रमाने माजी विद्यार्थ्यांसाठी नेटवर्किंग, विचारांची देवाणघेवाण आणि सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यामुळे संस्था आणि तिच्या माजी विद्यार्थ्यांमधील नाते आणखी दृढ झाले, अशी भावना संचालक डॉ आर डी खराडकर यांनी व्यक्त केली. कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या समन्वयक, डॉ प्रगती कोरडे, उपसंचालक डॉ एन बी हुले, डॉ एन यू कोरडे आणि सर्व विभागप्रमुखांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित होते.
रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी आणि कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी यांनी कार्यक्रमाच्या यशात योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे अभिनंदन केले.