जीएच रायसोनी कॉलेजचा वार्षिक स्नेह मेळावा अंतरागनी २०२५ उत्साहात साजरा
पुणे : जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटचा वार्षिक स्नेह मेळावा, “अंतरागनी २०२५”, विद्यार्थ्यांचा समृद्ध वारसा दर्शवणारी प्रतिभा आणि विविधतेच्या रंगीत प्रदर्शन सादरीकरणाने साजरी करण्यात आली.







कार्यक्रमात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. त्यात पारंपारिक नृत्य, स्किट्स आणि समकालीन संगीत सादरीकरणाचा समावेश होता. या कार्यक्रमात मिसमॅच डे आणि पारंपारिक पोषाक दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधुत गांधी, प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, प्रसिद्ध अभिनेता अजय पुरकर, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे, नेहा नाईक, अभिनेता तेजस बर्वे, बिपिन सुर्वे, कॅम्पस डायरेक्टर डॉ आर डी खराडकर आणि इतर उपस्थित होत. बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधुत गांधी यांनी माऊली ज्ञानेश्वर आणि जगतगुरू तुकाराम महाराज यांचे अभंग गायन करून उपस्थितांची मने जिंकली.
कॅम्पस डायरेक्टर डॉ आर डी खराडकर यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यांनी शैक्षणिक, नवोपक्रम आणि संशोधनातील यशासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे कौतुक केले.
दरम्यान, डान्स, फॅशन शो ने विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना एकत्र आणून विविधतेतील एकता साजर केली आणि महाविद्यालयीन समुदायामध्ये सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि समजूतदारपणाला प्रोत्साहन दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ वैशाली बाविस्कर व डॉ योगेश माळी यांनी पुढाकार घेतला. रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी आणि रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी यांनी कार्यक्रमाच्या चांगल्या आयोजनाबद्दल प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.