उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रा जी ए उस्मानी व कैलास औटी यांचा निवृत्तीनिमित्त सेवेचा गौरव
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सेवेतुन रसायन तंत्रज्ञान संस्थेतील ऑईल टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख प्रा जी ए उस्मानी तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील वरिष्ठ सहायक कैलास औटी हे दोघे दि ३१ मार्च रोजी निवृत्त होत असून कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते त्यांच्या सेवेचा गौरव करण्यात आला.
प्रा जी ए उस्मानी हे विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेतील ऑईल टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते ते १९९४ मध्ये विद्यापीठात रूजू झाले. जळगाव शहरात व बाहेर उत्तम सूत्रसंचालक म्हणून त्यांची ओळख आहे. कैलास औटी १९९३ मध्ये विद्यापीठात रूजू झाले सध्या ते राष्ट्रीय सेवा योजना विभागात वरीष्ठ सहायक म्हणून कार्यरत होते. कुलगुरू प्रा माहेश्वरी यांच्या हस्ते या दोघांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मचारी संघटना, मागासवर्गीय कर्मचारी संघटना यांच्यावतीने देखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील आदी उपस्थित होते. डॉ मुनाफ शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.