पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात स्वातंत्र्यसेनानी स्व बाबूराव काळे यांची जयंती साजरी

छत्रपती संभाजीनगर : हैदराबाद मुक्ती संग्रामात अपूर्व योगदान दिलेले स्वातंत्र्यसैनिक बाबुरावजी काळे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी भरीव असे योगदान दिलेले आहे त्यांचा जीवनपट हाच मराठवाड्याच्या संघर्षाचा इतिहास ठराव ते मराठवाड्याचे एक सात्विक नेतृत्व होते. असा सूर त्यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या परिसंवादामध्ये व्यक्त झाला.

स्वातंत्र्यसेनानी स्व बाबूराव काळे यांची जयंती साजरी करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बाबूरावजी काळे यांच्या समाजकारणातील योगदानाचे स्मरण करणे, त्यांची विचारधारा तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे, आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानावर चर्चा करणे हा या परिसंवादाचा मुख्य उद्देश होता.

Advertisement

कार्यक्रमाची सुरुवात उदघाटन सत्राने झाली, ज्यात प्रमुख पाहुणे आणि उदघाटक म्हणून जि प अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथ्रीकर उपस्थित होते. काळे साहेबांची दूरदृष्टी अत्यंत व्यापक होती नांदूर मधमेश्वर चे पाणी छ संभाजीनगरला मिळाले पाहिजे ही त्यांच्या सोळा कलमी कार्यक्रमातील प्रमुख  मागणी होती असे मत पाथ्रीकर यांनी मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अजिंठा शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश (दादा) काळे होते, ज्यांनी बाबूरावजी काळे यांच्या योगदानाबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित अशोक पाटील, प्रकाश मूगदिया यांनी स्व बाबुरावजी काळे यांच्या प्रेरणादायी आठवणींना उजाळा दिला. उदघाटन सत्राचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय मून यांनी करून स्व बाबूरावजी काळे यांचे योगदान विस्मृतीत गेल्याची खंत त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकात व्यक्त केले. 

उद्घाटन सत्रानंतर, दोन परिसंवाद सत्रे आयोजित करण्यात आली होती. पहिल्या परिसंवाद सत्राचे अध्यक्ष सागर मूगदिया (उपाध्यक्ष, युथ काँग्रेस छ संभाजीनगर) होते, ज्यांनी आपले विचार मांडले आणि उपस्थितांना प्रेरित केले. व दुसर्‍या परिसंवाद सत्राचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार प्रा जयदेव डोळे यांनी भूषविले.

या दोन्ही परिसंवाद मध्ये व्याख्याते म्हणून प्रा सर्जेराव बनसोडे, डॉ राजू वनारसे, डॉ भाऊसाहेब गाडेकर आणि डॉ लेखचंद मेश्राम यांनी स्व बाबुरावजी काळे यांच्या मराठवाडा मुक्ती संग्राम, आर्थिक विकास, शैक्षणिक विकास व राजकीय वाटचालीवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अहवाल उप प्राचार्य डॉ एस आर मंझा यांनी मांडले तर संचलन डॉ भाऊसाहेब गाडेकर आणि आभार डॉ शिल्पा जिवरग यांनी  मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. याच कार्यक्रमात महाविद्यालयात स्थापन झालेल्या स्वातंत्र्यसेनानी स्व बाबुरावजी काळे अध्यासन केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page