एमजीएमच्यावतीने आयोजित मोफत फिजिओथेरपी शिबिर यशस्वीपणे संपन्न
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपीच्या भौतिकोपचार केंद्रामार्फत नेहरू उद्यान एन ८ व बॉटनिकल गार्डन येथे दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ ते १६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान आयोजित दोन दिवसीय मोफत फिजिओथेरपी शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले. या शिबीराचे आयोजन तरुण आणि वृद्ध नागरिकांना त्यांच्या नियमित सकाळच्या व्यायाम सत्रात लाभ देण्यासाठी करण्यात आले होते.
या शिबीरात सहभागी झालेल्या सामान्य नागरिकांची शारीरिक मूल्यांकनासह आरोग्य आणि फिटनेस तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांना त्यांच्या वैद्यकीय स्थिती आणि तपासणी परिणामांवर आधारित व्यायामाची माहिती आणि त्यांनी कोणते व्यायाम करणे आवश्यक आहे हे सांगण्यात आले. फिजिओथेरपी महाविद्यालयात पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ . डॉस प्रकाश व डॉ. संस्कृती तहकिक यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे यशस्वीपणे आयोजन केले होते. या शिबिरासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. सरथ बाबू व प्रशासकीय अधिकारी प्रेरणा दळवी यांनी प्रोत्साहन दिले.