महात्मा गांधी मिशन विद्यापीठात ६ जून रोजी मोफत फोटोग्राफी कार्यशाळेचे आयोजन

वाईल्डलाईफ फोटोग्राफर बैजू पाटील यांचे मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या फोटोग्राफी विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार, दिनांक ६ जून २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता मोफत फोटोग्राफी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत जागतिक ख्यातीचे वाईल्डलाईफ फोटोग्राफर बैजू पाटील ‘बेसिक्स ऑफ फोटोग्राफी’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

MGM University
MGM University

या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांना फोटोग्राफीच्या मूलभूत संकल्पना समजावून सांगण्यात येणार असून फोटोग्राफी क्षेत्रातील करिअरच्या संधी, विविध अभ्यासक्रम तसेच एमजीएम विद्यापीठातर्फे उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्तीविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

एमजीएम विद्यापीठाच्या फोटोग्राफी विभागाने विद्यार्थ्यांसाठी ही एक विशेष संधी उपलब्ध करून दिली असून या क्षेत्रात करीयर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी या मोफत कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 8767875258, 9970851316 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com