आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची टीएसएस कन्सल्टन्सीत सॉफ्टवेअर डेव्हलपर पदावर निवड

वार्षिक ४.६ लाख वेतनश्रेणीतील प्लेसमेंटमुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण

शिरपूर : आर. सी. पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची नुकत्याच पार पडलेल्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये टीएसएस कन्सल्टन्सी प्रा. लि. या नामवंत कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदावर वार्षिक ₹४.६ लाख वेतनश्रेणीवर निवड झाली आहे. ही माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.

टीएसएस कन्सल्टन्सी ही वित्तीय क्षेत्रासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणारी आणि नाविन्यपूर्ण उत्पादने तयार करणारी अग्रगण्य कंपनी असून, तिच्या सेवांचा लाभ अनेक नामांकित बँका, स्टॉक एक्सचेंज आणि वित्तीय संस्थांना मिळतो.

या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये अंतिम वर्षातील पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी पात्र होते. निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत झाली — बुद्धिमत्ता चाचणी, तांत्रिक मुलाखत आणि एच.आर. राउंड.

यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे:

  • पृथ्वीराज विक्रम चौधरी
  • मितेश सूर्यकांत पाटील
  • जयेश पोपटराव सोनवणे
  • तुषार गंगाधर देवरे

या यशामध्ये महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या विशेष प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. विविध प्रशिक्षण उपक्रम, मॉक इंटरव्ह्यू, गट चर्चा, अॅप्टिट्यूड टेस्ट, टेक्निकल सेशन्स यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी योग्य दिशा मिळाली.

कॅम्पस प्लेसमेंटच्या यशस्वितेसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन, प्रा. के. पी. राणे व प्रा. एम. जे. पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, तसेच सर्व संचालक, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com