संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे चार विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत. वरदा विजय भुसारी हिने प्रथम क्रमांक प्राप्त करुन तिला डॉ. के. जी. देशमुख, सुवर्णपदक मिळाले आहे. तर तन्वी सुनिल बारब्दे द्वितीय, ममता शंकरराव मेश्राम तृतीय व प्राजक्ता गजानन रावले हिने चतुर्थ स्थान पटकाविले आहे.

Four students of physics department of Sant Gadge Baba Amravati University appeared in the merit list

विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांकडून गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विभागप्रमुख डॉ. गजानन मुळे तसेच सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com