महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात महाराष्ट्रातून CSMSS आयुर्वेद महाविद्यालयाला चार सुवर्णपदक
BAMS हिवाळी परीक्षेत महाराष्ट्रातून पवार, लगड यांना चार सुवर्णपदक
छत्रपती संभाजीनगर : शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आर्थिक सुदृढता आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा अधिक दर्जेदार करून विश्वासार्ह ओळख निर्माण करून देणाऱ्या कांचनवाडी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाचे नमिता गुंडू पवार व अश्विनी रेवणनाथ लगड या दोन विद्यार्थिनीने चार सुवर्णपदकं मिळवून महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. त्यांचा सत्कार संस्थेच्या विश्वस्त लता मुळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी सचिव पद्माकरराव मुळे, विश्वस्त समीरभैय्या मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या हिवाळी-२०२२ मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम वर्ष बीएएमएस परीक्षेत विद्यार्थिनी नमिता गुंडू पवार या विद्यार्थिनीने विद्यापीठातुन प्रथम येण्याचा मान म्हणुन “कै. पं. वैद्यराज ज्वालाप्रसादजी शर्मा शास्त्री भीषगाचार्य सुवर्णपदक” ०१ सुवर्ण तसेच “श्रीमती अन्नपूर्णा महादेवराव लखपती सुवर्णपदक” व “कै. हरिभाऊ गबाजी निकम सुवर्णपदक” शल्यतंत्र विषयात ०२ सुवर्ण असे एकूण ०३ सुवर्ण पदक पटकावले आहे.
तसेच अंतिम वर्ष बीएएमएस परीक्षेत अश्विनी रेवणनाथ लगड या विद्यार्थिनीने “ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री आबासाहेब लहानकर स्मृती सुवर्णपदक” शालाक्यतंत्र या विषयात ०१ सुवर्ण पदक पटकावले आहे.
त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख, उपप्राचार्य डॉ. जयश्री देशमुख, डॉ. नरेश निंबाळकर, बाबासाहेब प्रधान, विभागप्रमुख, अध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्याचे मनोगत..
सर्वप्रथम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकमध्ये महाराष्ट्रातून मला सर्वाधिक तीन सुवर्ण पदक मिळाले आहे. त्याचे सर्व श्रेय माझे आई, वडील व CSMSS आयुर्वेद महाविद्यालयाला देईन. कारण आज मी जे काही यश मिळवलं ते यांच्यामुळे. डॉ. श्रीकांत देशमुखसर आणि टीम यांनी जी जिद्द, सातत्य, काहीतरी नवीन करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली होती, खरे तर हेच माझे प्रेरणास्थान होते. त्याच्याकडून मी या गोष्टी शिकले.
नमिता गुंडु पवार
मी अतिशय गरीब कष्ट करणाऱ्या शेतकरी कुटूंबातून आलेली असून काबाडकष्ट करणारे आई, वडील, भाऊ आणि डॉ. श्रीकांत देशमुखसर व संपूर्ण टीम यांचा देखील आदर्श घेण्यासारखाच आहे. कोणती ही गोष्ट म्हणजे अकॅडेमिक, स्पोर्ट्स व योगा यामध्ये सर्वानी आम्हाला खूप मेहनत, सर्व तसेच मदत केली. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहे.
अश्विनी रेवणनाथ लगड