यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती साजरी
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या समारंभात विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आणि प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या हस्ते स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी स्व. इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्व शिस्तप्रिय, करारी आणि धाडसी स्वरूपाचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर, प्रा. सोनवणे यांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड यांनी केले. यावेळी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, विद्याशाखा संचालक, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी, राष्ट्रीय एकात्मतेच्या महत्वावर चर्चा करण्यात आली आणि उपस्थित सर्वांनी एकात्मतेचा संदेश पसरविण्याची शपथ घेतली.