राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागात ‘वन महोत्सव’ उत्साहात साजरा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागात शुक्रवार दि ४ जुलै २०२५ रोजी ‘वन महोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरण जपण्याच्या दृष्टीने विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ व्ही टी धुर्वे यांच्या नेतृत्वाखाली विभाग परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात एम एस्सी चे विद्यार्थी, संशोधन विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. डॉ. धुर्वे यांनी पर्यावरण रक्षणासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. हवामान बदलासारख्या जागतिक समस्यांवर मात करण्यासाठी व तरुण पिढीत पर्यावरणाबद्दल जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी हे उपक्रम अत्यंत गरजेचे आहेत, असे त्यांनी सांगितले.
विभागाच्या पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाबद्दलच्या बांधिलकीचे प्रयत्नशीलतेचे प्रतीक ठरले. कार्यक्रमाची सांगता नवरोपांची काळजी घेण्याची आणि भविष्यातही असेच पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याची शपथ घेऊन करण्यात आली.
