‘स्वारातीम’ विद्यापीठात प्र-कुलगुरू यांच्या हस्ते ध्वजारोहण
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांच्या हस्ते प्रथम पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी उपस्थितांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून तंबाखू मुक्ती ची शपथ देण्यात आली.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग खडके, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.शैलेश वाढेर, वित्त व लेखा अधिकारी डॉ.श्रीकांत अंधारे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ.मनोज रेड्डी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मलीकार्जुन करजगी याच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले तर राष्ट्रगीत ललित व कला संकुलाच्या विद्यार्थ्यांनी गायीले.