एमजीएममध्ये पहिल्या फोटोजेनी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशनचा ४२ वा वर्धापन दिन आणि दुसऱ्या एमजीएम युवा महोत्सवानिमित्त एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्ट्स येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या फोटोजेनी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज कानरयात आले. यावेळी, सुप्रसिद्ध छायाचित्रकार मिलिंद जोग, एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव, सचिव अंकुशराव कदम, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, प्रा.शिव कदम, साउंड डिझायनर संकेत धोटकर, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
आज एमजीएम परिसरात क्रीजतोफ़ केसलोवस्की या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या रेड, ब्लु आणि व्हाईट या सिनेमाच्या थिमला अनुसरून ‘स्टोरी टेलर हॅंड्स’च्या प्रतिकृतीचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच राज कपूर आणि ऋत्विक घटक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या चित्रपटांच्या पोस्टर्सचे प्रदर्शनही येथे लावण्यात आले आहे. आजच्या कार्यक्रमासाठी अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, उल्हास गवळी, नीलेश राऊत व सर्व संबंधित मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या.
आज फोटोजेनी चित्रपट महोत्सवात १६ लघुपट, २ माहितीपट आणि १ पूर्ण लांबीचा चित्रपट दाखविण्यात आले. यामध्ये एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या चित्रपटांसह देशभरातील चित्रपटही दाखविण्यात आले. यामध्ये अंतिम निवड झालेले चित्रपट हे अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दाखवण्यात येणार आहेत. मिलिंद जोग आणि संकेत धोटकर, कार्यक्रमाचे ज्युरी मेंबर्स म्हणून आपली भूमिका बजावली.