डेक्कन कॉलेजमध्ये जैन कला-स्थापत्य व पुरातत्त्व या विषयावर पहिले वार्षिक संशोधन चर्चासत्र संपन्न
जैन कला-स्थापत्यावरील अध्ययन अत्यंत महत्त्वाचे – प्रा कुमूद कानिटकर
पुणे : डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, अभिमत विद्यापीठाच्या प्राभाइसं व पुरातत्त्व विभाग व भगवान शीतलनाथ जैन पुरातत्त्व अध्ययन यांच्या संयुक्त विद्यमाने जैन कला, स्थापत्य, पुरातत्त्व या विषयावर पहिले राष्ट्रीय वार्षिक संशोधन चर्चासत्राचे बीजभाषण देताना प्रसिध्द कलेतिहास अभ्यासक प्रा कुमुद कानिटकर यांनी वरील उद्गार काढले.
देशातील १७ युवा संशोधकांनी जैन कला, स्थापत्य, शिल्पकला, पुरातत्व, इतिहास व वाङ्मयीन परंपरा आदि विषयावर या चर्चासत्रात संशोधन लेख सादर केलेत. या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरु प्रा प्रमोद पांडे यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात प्रा पांडे यांनी जैन अध्यासना मार्फत, सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती देत जैन अध्ययनाचे सद्यस्थितीतील महत्व प्रतिपादित केले. उद्घादन सोहळ्या प्रसंगी इंटरनॅशनल स्कूल फॉर जैन स्टडीजचे संचालक डॉ श्रीनेत्र पांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ श्रीकांत गणवीर, तर स्वागतपर भाषण प्रा डॉ पी डी साबळे यांनी केले आणि सूत्रसंचालन ओशिन बंब यांनी केले.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मुंबईचे पुरातत्वविद अधिक्षक डॉ शुभ मजुमदार, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अभ्यागत व्याख्याता डॉ श्रीकांत प्रधान व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत व प्राकृत विभागाच्या माजी प्राध्यापिका डॉ राजश्री मोहाडीकर यांनी चर्चासत्राच्या विविध तांत्रिक सत्राचे अध्यक्षस्थान भूषविले.
चर्चासत्राच्या समारोप सोहळ्याचे अध्यक्ष स्थान प्र-कुलगुरु प्रा प्रसाद जोशी यांनी भूषविले. या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून इंटरनॅशनल स्कूल फॉर जैन स्टडीजचे डॉ अशोक सिंह उपस्थित होते. प्राभाइस व पुरातत्त्व विभागाच्या प्रमुख प्रा शाहिदा अन्सारी यांनी प्रास्ताविक केले. प्रा गोपाळ जोगे यांनी चर्चासत्राचा अहवाल सादर केला. संपूर्ण भारतातील १५० संशोधक-विद्यार्थी या चर्चासत्राला उपस्थित होते.