दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेच्या  कॅन्सर रुग्णालयात स्तनांच्या पुनर्रचनेकरिता प्रथमच एएलटी शस्त्रक्रिया 

सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, सावंगी (मेघे)  स्तनांच्या पुनर्रचनेसाठी प्रथमच एएलटी मायक्रोव्हस्कुलर फ्री फ्लॅप शस्त्रक्रिया 

वर्धा – सावंगी मेघे येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित सिद्धार्थ गुप्ता मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये स्तनांच्या पुनर्रचनेकरिता प्रथमच एन्टेरो लॅटरल थाय मायक्रोव्हॅस्कुलर फ्री फ्लॅप शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. छातीवरील २५ बाय १८ सेंटीमीटर भागात कर्करोग पसरलेल्या ४८ वर्षीय स्त्रीरुग्णावर स्तन प्रत्यारोपण व पुनर्रचनेसाठी ही सुघटन शस्त्रक्रिया करण्यात आली, असे प्लास्टिक व रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. फिरोज राजीव बोरले यांनी सांगितले.

डॉ. फिरोज बोरले यांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून प्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीत पदवी प्राप्त केली असून सूक्ष्म रक्तवाहिन्यांची पुनर्रचना करणाऱ्या हजाराहून अधिक शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. स्तनांच्या पुनर्रचनेसाठी अद्ययावत असलेली एएलटी मायक्रोव्हस्कुलर फ्री फ्लॅप शस्त्रक्रिया प्रथमच सावंगी येथील कर्करोग रुग्णालयात करण्यात आली आहे. या विशेष शस्त्रक्रियेत डॉ. फिरोज बोरले यांना कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. भूषण जाजू, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. अमोल सिंघम यांच्यासह तंत्रज्ञ आणि परिचारक चमूचे सहकार्य लाभले. परंपरागत शास्त्रक्रियेपेक्षा मायक्रोव्हॅस्कुलर फ्री फ्लॅप ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया उच्चतम दर्जाची, अत्यंत प्रभावी, परिणाकारक आणि रुग्णाचे शरीरसौंदर्य जपणारी आहे, असेही डॉ. बोरले यांनी सांगितले. शरीराच्या एका भागातील पेशी काढून त्या पेशींचे आवश्यकता असलेल्या भागात प्रत्यारोपण करून विद्रुप होत असलेल्या अवयवाची पुनर्रचना करणारी ही सुघटन शस्त्रक्रिया आहे. आकस्मिक दुर्घटना, अपघात, भाजणे किंवा स्तनांच्या कर्करोगावरील उपचारानंतर शरीरावर निर्माण होणाऱ्या उणिवांची पूर्तता, पुनर्रचना आणि सौंदर्यीकरण करणाऱ्या या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांची जीवनशैली सुधारण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वासही वृद्धिंगत करते.  

Advertisement

सिद्धार्थ गुप्ता मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या कर्करोग शस्त्रक्रिया आणि कर्करोगावरील अद्यावत उपचारप्रणाली उपलब्ध आहे. केवळ महानगरांमध्ये उपलब्ध असलेली स्तनांच्या पुनर्बांधणीसाठी वापरल्या जाणारी प्रगत मायक्रोव्हस्कुलर फ्री फ्लॅप शस्त्रक्रिया आता सावंगी रुग्णालयात कार्यान्वित झाली असून आमच्या वैद्यकीय सेवेत अधिक भर पडली आहे. आकस्मिक दुर्घटना, अपघात, भाजणे किंवा स्तनांच्या कर्करोगावरील उपचारानंतर शरीरावर निर्माण होणाऱ्या उणिवांची पूर्तता, पुनर्रचना आणि सौंदर्यीकरण करणाऱ्या या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांची जीवनशैली सुधारण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वासही वृद्धिंगत करते, असे मत कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ.नितीन भोला यांनी व्यक्त केले.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page