देवगिरी महाविद्यालयात “आर्थिक साक्षरता कार्यक्रम” कोणा कोणा शिक्षा अभियानांतर्गत तीन दिवशीय कार्यशाळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयात दिनांक ०८/०२/२०२४ ते १०/०२/२०२४ या कालावधीत वाणिज्य विभागाअंतर्गत कोणा कोणा शिक्षा अभियानांतर्गत ‘आर्थिक साक्षरता कार्यक्रम” तीन दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. सदरील कार्यशाळेसाठी वाणिज्य विद्याशाखेतील वर्षातील 88 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. वित्तीय साक्षरता कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. राजेश लहाने तर प्रमुख वक्ते म्हणून प्रभाकर उदावंत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना डॉ. कैलास ठोंबरे यांनी सदरील कार्यशाळा विद्यार्थ्यांना वित्तीय कौशल्य विकसित होण्यासाठी तसेच आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे कारण ती लोकांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यास मदत करते. तीन दिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते प्रभाकर उदावंत व प्रमिला सावंत यांनी आर्थिक साक्षरता म्हणजे वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन, बजेट आणि गुंतवणूक यासह विविध आर्थिक कौशल्ये समजून घेण्याची आणि प्रभावीपणे वापरण्याची क्षमता तयार करणे होय. आर्थिक साक्षरतेचा अर्थ हा तुमच्या पैशाशी असलेल्या नातेसंबंधाचा पाया आहे आणि तो शिकण्याचा आयुष्यभराचा प्रवास आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक वित्तविषयक सोप्या संकल्पनांवर शिक्षित करणे हा या कोर्सचा उद्देश आहे.
सदरील कोर्समध्ये उत्पन्न, कर आकारणी, खर्च, बचत आणि गुंतवणुकीचे मार्ग, कर्ज घेणे, जोखीम व्यवस्थापित करणे, बजेटिंग इत्यादीसारख्या सोप्या भाषेतील विषयांचा समावेश आहे. नवशिक्यांसाठी आर्थिक साक्षरता मध्ये बजेट तयार करणे बचतीला प्राधान्य देणे क्रेडिट कर्ज आर्थिक साक्षरता आर्थिक शिक्षण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आर्थिक शिक्षण आर्थिक साक्षरतेच्या 5 स्तंभांवर – कमवा. तुम्ही जे काही कमावले आहे त्यातून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी तुमचे वेतन आणि फायदे समजून घ्या, बचत करा आणि गुंतवणूक करा, भविष्यातील उद्दिष्टांसाठी बचत करा, जसे घर खरेदी करणे किंवा सेवानिवृत्ती, संरक्षण करा,खर्च करा, कर्ज घ्या. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, सेबी याबाबत व्यवस्थापक, संशोधक, विश्लेषक, बँक ऑफिस व्यवस्थापक इत्यादी ठिकाणी वित्तीय क्षेत्रात भरपूर संधी भविष्यात उपलब्ध होऊ शकतात असे प्रतिपादीत केले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. राजेश लहाने यांनी आर्थिक नियोजन हे वय किंवा तुम्ही किती श्रीमंत आहात यावर अवलंबून नसून ते तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यावर अवलंबून आहे. तुम्हाला फक्त तुमची आर्थिक उद्दिष्टे पारिभाषित करणे आणि त्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. तुम्ही सध्या कुठे उभे आहात याचे विश्लेषण करा (आर्थिकदृष्ट्या) आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे कशी साध्य करायची याचा स्पष्ट रोड मॅप द्या. या तीन गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तणावमुक्त जीवन जगू शकता हे नक्की असे नमूद केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. कैलास ठोंबरे यांनी केले. सदरील कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर व उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेसाठी समन्वयक म्हणून डॉ. कैलास ठोंबरे यांनी कार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले तर डॉ. कैलास ठोंबरे यांनी आभार मानले.