डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’इंद्रधनुष्य’ युवा महोत्सवासाठी राबणा-यांचा कुलगुरुंच्या हस्ते गौरव
’इंद्रधनुष्य’साठी गठित ३६ अध्यक्ष, सदस्यांची उपस्थिती
छत्रपती संभाजीनगर : ’इंद्रधनुष्य’ युवा महोत्सवाच्या आयोजनात योगदान देणा-या विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्यांचा कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास ’इंद्रधनुष्य २०२३-२०२४’ यजमानपद दिले. कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव यशस्वीरित्या घेण्यात आला. ११ ते १५ मार्च दरम्यान, विद्यापीठ परिसरात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. २४ विद्यापीठाचे सुमारे ८५० कलावंत सहभागी झाले.
या महोत्सावासाठी सल्लागार व संयोजन समिती स्थापन करण्यात आली. तसेच ’राजभवन’च्या निर्देशाप्रमाणे ३३ उपसमित्यांची स्थापना करण्यात आली. या शिवाय तक्रार निवार समितीची स्थापन करण्यात आली. महोत्सवाच्या आयोजन या सर्व ३६ समित्यांचे अध्यक्ष, सदस्यांनी योगदान दिले. या पाश्र्वभुमीवर कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते सर्वांचा स्मृतिचिन्ह, गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले. महात्मा फुले सभागृहात मंगळवारी (दि.१९) सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रकुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ गजानन सानप, डॉ अंकुश कदम आदींची उपस्थिती होती. या महोत्सवात सर्वांनी अत्यंत प्रामाणिकपणे व अविरत परिश्रम घेतले, असे कुलगुरु डॉ विजय फुलारी यावेळी म्हणाले. विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ कैलास अंभुरे यांनी सोहळयाचे संयोजन केले.
विविध समित्या
गेल्या १५ वर्षात तीन वेळा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ’इंद्रधनुष्य’ युवा महोत्सवाचे यजमानपद यशस्वीरित्या पेलले. सन २००८, २०१६ व २०२४ अशा तीन वेळा ही स्पर्धा घेण्यात आली. कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे नेटके नियोजन करण्यात आले. या सर्व समित्यांचे मिळवून जवळपास १५० हून अधिक सदस्यांनी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी महोत्सवात मेहनत घेतली. विविध विभागातील विद्यार्थी, स्वयंसेवक यांनीही महोत्वासाठी आपले योगदान दिले.
इंद्रधनुष्य आयोजनासाठी गठित समित्या
- सल्लागार समिती
- संयोजन समिती
- निवास समिती
- नोंदणी समिती
- भोजन समिती
- आयटी समिती
- स्थळे वाटप आणि व्यवस्था समिती
- मुद्रण समिती
- बॅनर आणि चिन्ह समिती
- ध्वज व्यवस्था समिती
- रंगमंच व्यवस्था समिती
- ध्वनी व्यवस्था समिती
- मंडप समिती
- प्रसिद्धी समिती
- आदरातिथ्य समिती
- परीक्षक समिती
- प्रथमोपचार सहाय्य समिती
- दक्षता समिती
- मदत समिती
- वाहतूक समिती
- निमंत्रण समिती
- राजशिष्टाचार समिती
- आसन व्यवस्था समिती
- स्वागत समिती
- पाणी समिती
- भांडार समिती
- फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग समिती
- संपर्क समिती
- प्रमाणपत्र समिती
- स्वयंसेवक समिती
- निधी उभारणी समिती
- लेखा समिती
- अहवाल लेखन समिती
- सत्कार समिती
- सांस्कृतिक कार्यक्रम समिती
- तक्रार निवारण समिती
- स्वच्छता समिती
- सुरक्षा समिती
- माहिती तंत्रज्ञान समिती
- शोभायात्रा नियोजन समिती
- रंगमंच नियोजन क्र. १ ते ५ समिती आदी .