संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक निरोप
विद्यापीठाचा प्रत्येक कर्मचारी ‘डायमंड’ – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते
अमरावती : विद्यापीठाचे कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत, आपल्या कुटुंबाप्रमाणे त्यांनी विद्यापीठाला प्रामाणिक सेवा दिली आहे, त्यामुळे प्रत्येक कर्मचारी हा विद्यापीठाचा एक हिराच आहे, असे भावोद्गार कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी काढले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
व्यासपीठावर कुलसचिव डॉ अविनाश असनारे, उपकुलसचिव तथा प्रभारी वित्त व लेखा अधिकारी मंगेश वरखेडे, नियंत्रण अधिकारी सहा कुलसचिव रविंद्र सयाम, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ गजानन मुळे, सहा ग्रंथपाल व्ही डी बापते, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख, ऑफिसर्स फोरम अध्यक्ष शशिकांत रोडे, सत्कारमूर्ती गिरीश पहूरकर, पहूरकर, राजेंद्र पाचकवडे, पाचकवडे, एच एस शिरकरे, शिरकरे, बाबाराव चौधरी चौधरी, सुधाकर पांडे, पांडे, जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांची उपस्थिती होती.
कुलगुरू पुढे म्हणाले, मनुष्यबळाचा प्रश्न सोडविण्याचे विद्यापीठाचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. विद्यापीठीय मनुष्यबळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. एक टिम म्हणून आपले काम असेच पुढे नेऊ असे सांगून त्यांनी सत्कारमूर्तींना पुढील आयुष्याच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. यावेळी गिरीश पहूरकर, राजेंद्र पाचकवडे, एच एस शिरखरे, बाबाराव चौधरी, सुधाकर पांडे यांचा कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी शॉल, श्रीफळ, गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. तर पहूरकर, शिरखरे यांचा गणेशे यांनी, पाचकवडे, चौधरी व पांडे यांचा मनिषा बोंडे यांनी साडीचोळी, कुंकवाचा करंडा देऊन सत्कार केला.
याप्रसंगी सत्कारमूर्ती गिरीश पहूरकर, राजेंद्र पाचकवडे, एच एस शिरखरे, बाबाराव चौधरी, सुधाकर पांडे यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगतांना सहकारी कर्मचाऱ्यांच्या मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. नियंत्रण अधिकारी रविंद्र सयाम, डॉ गजानन मुळे, व्ही डी बापते, अजय देशमुख यांनीही मनोगतातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष मंगेश वरखेडे व कोषाध्यक्ष राजेश एडले तसेच पदाधिकाऱ्यांनी सत्कारमूर्तींचा भागभांडवलाचा धनादेश देऊन सत्कार केला. राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक कुलसचिव डॉ अविनाश असनारे, संचालन जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांनी, तर आभार कुलगुरुंचे स्वीय सहायक रमेश जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच सत्कारमूर्तींच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.