राजमाता जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालयाच्या दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार
घोडेगाव : राजमाता जिजाऊ वरीष्ठ महाविद्यालय, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय, सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालय, स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय घोडेगाव ता खुलताबाद येथे साईनाथ पाटील जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला.



या कार्यक्रमाचे अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव हे होते. तर मुख्य अतिथी म्हणुन देवेंद्र पाटील सर (परम स्किल ट्रेनिंग सेंटर समन्वयक), रामेश्वर पाटील साहेब, प्रा माळकर सर, द्वारकादास पाटील जाधव हे प्राचार्य डॉ घुगे सर, प्रशासकीय अधिकारी गोमलाडु सर, मुख्याध्यापक खैरनार सर होते. दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक खैरनार सर यांनी केले. निरोप समारंभ निमित्त विद्यार्थ्यांनी व जिते सर, तुकाराम जाधव सर, प्रशासकीय अधिकारी गोमलाडु सर, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मुख्य अतिथी देवेंद्र पाटील यांनी art of living बद्दल सांगितले. माळकर सर यांनी विद्यार्थ्यांना खुप सुंदर मार्गदर्शन केले. नंतर रामेश्वर पाटील यांनी नवीन Skill Based Course बद्दल माहीती दिली व पुढील काही महिन्यांपासून आणखी नवीन Computer course सुरू होत आहेत याबद्दल माहिती दिली. नंतर शेवटी अध्यक्षीय भाषण झाले. साहेबांनी विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकूर मॅडम केले, तर आभार प्राचार्य डाॅ डी डी घुगेसर सर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकैतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.