एमजीएम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या डॉ जी वाय पाथ्रीकर संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ मध्ये शिकणाऱ्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ विद्यापीठाच्या आर्यभट्ट सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी, प्राचार्या डॉ प्राप्ती देशमुख, विभागप्रमुख डॉ संजय आझादे, विभागप्रमुख डॉ सतीश संकाये, प्रा निरुपमा पाटोदकर, इतर सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.

विद्यापीठात झालेल्या निरोप समारंभ कार्यक्रमात महाविद्यालयाच्या बी एसस्सी कॉम्पुटर सायन्स, बीसीए सायन्स, बी एससी इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, इंटिग्रेटेड बी एससी – एम एससी डेटा सायन्स, बी एससी ऍनिमेशन, एम एससी कॉम्पुटर सायन्स , एम एससी इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आदि अभ्यासक्रम शिकणाऱ्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी आपल्या महाविद्यालयीन जीवनात आलेल्या अनुभवांसह या दरम्यानच्या काळातील आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Advertisement

यावेळी बोलताना प्राचार्या प्रा डॉ प्राप्ती देशमुख म्हणाल्या, आपल्या जीवनात विशेषत: विद्यार्थी जीवनात वेळेला अनन्यसाधारण महत्व असून बघता – बघता आपण आज आपले शिक्षण पूर्ण करून पुढील प्रवासासाठी मार्गक्रमण करीत आहात. सर्वांनी वेळेचे महत्व ओळखून आपल्या जीवनात ज्याही क्षेत्रात जाऊ तिथे उत्तम आणि प्रतिभासंपन्न काम करावे. आजचा दिवस हा आपल्या महाविद्यालयीन जीवनाचा शेवटचा दिवस असला तरी करियरच्या दृष्टीने एक नवीन सुरूवात या माध्यमातून आपली होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये झालेला महत्वपूर्ण बदल हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक असून या माध्यमातून निर्माण होणाऱ्या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घेणे आवश्यक आहे. आपले भविष्य उज्ज्वल असून आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस माझ्याकडून मनस्वी शुभेच्छा !

यावेळी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास भेटवस्तू देत आपले मनोगत व्यक्त केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नियोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page