‘एम.फिल’ शोधप्रबंध दाखल करण्यास मुदतवाढ
औरंगाबाद,दि.१ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एम.फिलचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार एम.फिल अभ्यासक्रम दोन वर्षापासून बंद करण्यात आला आहे. तथापि २०२०-२१ या अंतिम बॅचच्या विद्यार्थ्यांना शोध प्रबंध दाखल करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि सदर तारीख वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यापीठ मुख्य परिसरात एम.फिल करीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ३० सप्टेंबर पर्यंत पाच हजार रुपये विलंब शुल्कासह शोधप्रबंध सादर करावेत, असे पदव्यूत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ.ईश्वर मंझा यांनी कळविले आहे.