मुक्त विद्यापीठाच्या सर्व अभ्यासकेंद्रांसाठी ‘उत्तम कृती लेख लेखन स्पर्धेस’ मुदत वाढ

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व अभ्यासकेंद्रांसाठी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाचे संपुर्ण शैक्षणिक कामकाज आणखी प्रभावी व्हावे या उद्देशाने विद्यापीठाच्या संवाद पत्रिकेच्यावतीने विद्यापीठाच्या सर्व अभ्यासकेंद्रावरील अभ्यासकेंद्र संचालक, समन्वयक, संमंत्रक, अध्ययनार्थी, आणि केंद्रसहाय्यक यांच्यासाठी “उत्तम कृती लेख लेखन स्पर्धा” (Best Practices in our study center) आयोजित करण्यात आली आहे.

Yashwantrao Chavan Maharashtra Open University,, Gyan Gangotri, Nashik ycmou

यापुर्वी स्पर्धकांनी आपले लेख सुवाच्च अक्षरात हस्त लिखित किंवा टंकलिखित करून दि १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठवावे असे, कळविण्यातआले होते. परंतू अभ्यासकेंद्रावरील अभ्यासकेंद्र संचालक, समन्वयक, संमंत्रक, अध्ययनार्थी, आणि केंद्रसहाय्यक यांना प्रवेश प्रक्रिया आणि इतर शैक्षणिक कामांमुळे वेळेत आपले लेख पाठविता आले नाहीत. त्यामुळे या स्पर्धेची मुदत दि 18 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढविण्यास विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांनी मान्यता दिली आहे.

लेख लेखनासाठी पुढील मुद्दे अपेक्षीत आहे :- शीर्षक, प्रस्तावना, पूर्वतयारी, उत्तम कृतीचा अध्ययनार्थीला झालेला उपयोग, आकडेवारी, अध्ययनार्थी प्रवेशवृद्धी, अध्ययनार्थी स्वयं अध्ययनास उपयोग, संमंत्रणसत्र उपस्थितीत वाढ, अंतर्गत प्रात्यक्षिक कार्य, स्वाध्याय, गृहपाठ, प्रकल्प, अंतिम लेखी परीक्षा इ च्या गुणात्मक विकासासाठी झालेले उपयोजन इ.

Advertisement

स्पर्धकांनी लेखनातील आशय पुरावे असल्यास ते सोबत पाठवावेत. (उदा फोटो, अहवाल, इतिवृत्त, तक्ता इ) लेखनाच्या शब्द मर्यादेस बंधन नाही सविस्तर लिहावे. उत्तम लेखांना विद्यापीठाच्या संवाद पत्रिकेत प्रसिद्धी दिली जाईल. तसेच यथावकाश अध्ययनार्थीसाठी उपयुक्त ग्रंथ स्वरुपात व ऑनलाईन स्वरुपात संकेतस्थळावर प्रसिद्धी दिली जाईल.

पारितोषिकाचे स्वरुप पुढीलप्रमाणे :– प्रथम – ३००० रु/-, द्वितीत- २०००/- व तृतीय १०००/-, उत्तेजनार्थ ५०० रु/-  रोख व प्रमाणपत्र देण्यात येईल.    

लेख पाठविण्याची कार्यपद्धती – अभ्यासकेंद्रावरील अभ्यासकेंद्र संचालक, समन्वयक, संमंत्रक, अध्ययनार्थी, आणि केंद्रसहाय्यक इत्यादींनी आपले लेख सुवाच्च अक्षरात हस्त लिखित किंवा टंकलिखित करून दिनांक 18 सप्टेंबर 2024 पर्यंत समक्ष, पोस्टाने – प्रा. विजयकुमार पाईकराव, कार्यकारी संपादक, संवाद पत्रिका, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक– ४२२२२२ ह्या पत्त्यावर  किंवा ई-मेल paikrao_vk@ycmou.digitaluniversity.ac वर पाठवावे.  

लेख लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याची संभाव्य तारीख दि ०५ ऑक्टोबर २०२४ अंतरराष्ट्रीय शिक्षक दिनी केला जाईल. परीक्षकांनी दिलेला निर्णय हा अंतिम व बंधनकाराक राहील.

सदर स्पर्धेस अभ्यासकेंद्रावरील जास्तीत जास्त अभ्यासकेंद्र संचालक, समन्वयक, संमंत्रक, अध्ययनार्थी आणि केंद्रसहाय्यक यांनी सहभाग नोंदवावा अशी माहिती, प्रा विजयकुमार पाईकराव, कार्यकारी संपादक, संवाद पत्रिका, मुक्त विद्यापीठ यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page