शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राच्या परीक्षा अर्जासाठी १२ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या बी.ए.,बी.कॉम,एम.ए.(मराठी,हिंदी,इंग्रजी,समाजशास्त्र,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र,इतिहास), एम.कॉम, एम.एस्सी (गणित) आदी अभ्यासक्रमाच्या परीक्षा अर्ज भरणेसाठी विद्यार्थी हितास्तव सोमवार दि.१२ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती संचालक प्रा. डॉ. डी. के. मोरे यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठ

डॉ. मोरे म्हणाले की, एम.ए.,/ एम.कॉम.भाग १ व २, बी.ए.,बी.कॉम. भाग १, २ व ३ मधील जे विद्यार्थी  सेमिस्टर १, ३ व ५ मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी सेमिस्टर २, ४ व ६ चा परीक्षा फॉर्म  भरण्याची आवश्यकता नाही. तसेच जे विद्यार्थी सेमिस्टर १, ३, व ५ मध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यांना अनुत्तीर्ण परीक्षा फॉर्म व संबधित अनुत्तीर्ण विषयाची परीक्षा फी भरावी लागणार आहे. तरी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी दि १२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत परीक्षा व मूल्यमापन मंडळाने मुदतवाढ दिली असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म वेळेत भरावेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापी रिपीटरचा फॉर्म भरलेले नाही त्यांनी https://sukapps.unishivaji.ac.in/stud-reg/#/login या लिंक जावून भरावा. असे आवाहन प्रा. डॉ. डी. के. मोरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com