गोंडवाना विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागांतर्गत फिजिक्स सोसायटीची स्थापना
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात , पदव्युत्तर शैक्षणिक भौतिकशास्त्र विभागाअंतर्गत फिजिक्स सोसायटीची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, डॉ. श्रीराम कावळे तसेच प्रमुख पाहुणे तथा उद्घाटक म्हणून प्राचार्य विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर वर्धा , डॉ. किशोर रेवतकर, विशेष अतिथी म्हणून विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे, भौतिकशास्त्र विभागाचे समन्वयक, डॉ.सुनील बागडे उपस्थित होते.
फिजिक्स सोसायटीचे महत्व व जबाबदारी या बद्दल कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. किशोर रेवतकर यांनी मार्गदर्शन केले, तसेच फिजिक्स सोसायटी अंतर्गत विविध कार्यक्रम ,स्पर्धा, सेमिनार घेणे व आयोजित करण्यासंबंधित मार्गदर्शन विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे यांनी केले. भौतिकशास्त्र समन्वयक डॉ. सुनिल बागडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमामध्ये फिजिक्स सोसायटीचे पदाधिकारी यांचे स्वागत करून सोसायटी स्थापन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स. प्रा. डॉ. नंदकिशोर मेश्राम यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय स. प्रा. डॉ. अपर्णा भाके, यानी करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गायत्री सहारे व प्रांजली नागरे यांनी तर आभार आदिती ब्रम्हे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता भौतिकशास्त्र विभागाचे स. प्रा. विकास पुनसे, डॉ. नंदकिशोर मेश्राम, डॉ. अपर्णा भाके, डॉ. प्रितेश जाधव यांनी परिश्रम घेतले.