डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘एनईपी सेल’ची स्थापना
‘जिल्हा निहाय’ टास्क फोर्सही नियुक्त
वर्षभर विविध उपक्रम राबविणार : डॉ.शिरसाठ
औरंगाबाद : ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०’च्या प्रभावी अमंलबजावणीसाठी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-कक्ष’ (एनईपी सेल) स्थापन करण्यात आला आहे. तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चारही जिल्हयात ‘टास्क फोर्स’ही नियुक्त करण्यात आला आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या संदर्भात प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या समितीत कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.प्रशांत अमृतकर, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.भारती गवळी, डॉ.चंद्रकांत कोकाटे, डॉ.अंजली राजभोज, सदस्य सचिव डॉ.एन.एन.बंदेला आदींचा समावेश आहे. या समितीची प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. डॉ.शिरसाठ यांनी महत्वपूर्ण सूनचा केल्या तर कार्यशाळेच्या माध्यमातून वर्षभर कार्यक्रम घेण्याची सूचना डॉ.गजानन सानप यांनी केली. बैठकीसाठी उपकुलसचिव डॉ.संजय कवडे, अशिष वडोदकर, डॉ.वैâलास त्रिभूवन आदींनी प्रयत्न केले.
जिल्हानिहाय ‘टास्क फोर्स’
नवीन शैक्षणिक धोरणाच्या जिल्हानिहाय अंमलबजावणीसाठी प्रत्येकी ८ ते १० सदस्यांचा ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आला आहे.
जिल्हानिहाय टास्क फोर्स व अध्यक्ष पुढीलप्रमाणे :-
बीड जिल्हा – प्राचार्य डॉ.गौतम पाटील,
औरंगाबाद – डॉ.योगिता होके पाटील,
जालना – प्राचार्य डॉ.भारत खंदारे तर
उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी डॉ.अकुंश कदम यांनी नियुकती करण्यात आली.
सर्वच जिल्ह्याचे अध्यक्ष व्यवस्थापन परिषद सदस्य असून अधिसभा, विद्या परिषद व प्राचार्यांचा यामध्ये समावेश आहे. तर चारही अधिष्ठाता हे जिल्हा निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहेत.