”बामु” विद्यापीठातील स्त्री अभ्यासकेंद्रात निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना
उपस्थितांना दिली मतदान शपथ
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रात निवडणूक साक्षरता मंडळाची करण्यात आली. यावेळी नव मतदारांना तसेच विद्यार्थ्यांना मतदानासाठी प्रेरित करण्यासाठी ‘युवा वर्ग साजरा करणार मतदान पर्व’ हे अभियान घेण्यात आले. तसेच इलेक्ट्रॉल लिटरसी क्लबची देखील स्थापना केंद्रातर्फे करण्यात आली. विभागाच्या पाठीमासिक सभागृहात शनिवारी (दि ११) हा कार्यक्रम झाला.
या वेळी केंद्राच्या संचालक डॉ निर्मला जाधव यांनी मार्गदर्शन केले. एक सशक्त देश, राष्ट्रनिर्मिती साठी आपले एक मत किती महत्वपूर्ण आहे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच हक्क व अधिकार मागताना आपल्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडू नये व त्याचाच एक भाग म्हणून आपण जागरूक नागरिक बनूयात व आपले मतदान करूयात असे आवाहन डॉ जाधव यांनी यावेळी बोलताना केले.
याप्रसंगी केंद्रातील डॉ अश्विनी मोरे, तसेच केंद्राच्या इलेक्ट्रल लिटरसी क्लबच्या नोडल ऑफिसर डॉ सविता बहिरट, डॉ विकास टाचले, संजय पोळ यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.