वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये निबंध स्पर्धा संपन्न
कोडोळी / कोल्हापूर : श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मराठी भाषेच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा विविध विषयावर ठेवण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील जेष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस निमित्याने मराठी भाषा दिन साजरा केला जातो याबद्दलची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एस. मंजाप्पा यांनी दिली.
तसेच संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील आणि विश्वस्त विनिता पाटील यांनी या दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक वैशाली पोवार यांचे मार्गदर्शन लाभले. ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रा. कविता माने आणि प्रा. सृष्टी सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.