कराडचे पर्यावरण…!
कराडचे पर्यावरण…
माणसाच्या घडण्यावर त्याचा सभोवताल परिणाम करत असतो, आपले किंवा आपल्या मुलांचे भविष्य काय असले, असे असेल हे आपला भवताल ठरवत असतो. सगळ्यांच्या बाबतीत नसेलही परंतु ७५ टक्के माणसं या भवतालच्या वातावरणाचे बळी ठरतात. काय आहे हे भवताल हे जाणून घेण्याचा एक थोडासा प्रयत्न करत आहोत. प्रातिनिधीक स्वरूपात कराड शहराचा विचार करणार आहोत.
courtesy : gruhkhioj.com
मानवी जीवनात असंख्य ताण-तणावांना समोरे जावे लागत असताना निर्माण झालेला ताण कोणत्यान् कोणत्या माध्यमातून घालविण्याचा मनुष्य प्रयत्न करत असतो. मग आज त्यांच्यासमोर एकाग्र होणे, ध्यानधारणा करणे, बागेत एकांत ठिकाणी बसणे किंवा नशेच्या आहारी जाणे हेच पर्याय आहेत. आज मोठा तरूण वर्ग हा नशेच्या आहारी जाताना दिसत आहेत. त्याला येथील भांडवली, चंगळवादी व्यवस्थाही तितकीच कारणीभूत आहे. कराड शहरामध्ये साधारणता ३-४ किलोमीटरच्या परिपेक्षात १० हजार पेक्षा विद्यार्थी वर्ग आहे, ४० हजार पेक्षा युवक आहेत आणि १० हजार पेक्षा जास्त माणसे दररोज ये-जा करतात. जेव्हा ही माणसे कुठल्याही ताण-तणावाने ग्रासलेली असतात. तेव्हा एकांत, एकटेपणा देमारी २० ते २५ मंदीर आपल्याला असल्याची दिसतात. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पाहिले तर ४ ते ५ ग्रंथालय, २ ते ३ गार्डन, स्टेडियमचा परिसर पहावयास मिळतात.
साधारणतः १ लाख संख्येच्या या शहरात विद्यार्थी-युवकांना मानसिक ताण आल्यानंतर त्यांना एकांताची गरज आहे, तशा जागांची गरज आहे, आधाराची गरज आहे. परंतु हे आधार नगण्य आहेत. मग एकच आधार किंवा सोबत असते नशा ! जी जीवन जाळून खाक करते. या परिसरात साधारणतः ९० पेक्षा जास्त बार, १५० पेक्षा जास्त हॉटेल, १००० च्या वरती पानपट्ट्या आहेत. की जेथे देशाचे आणि आपले उज्ज्वल भवितव्य ताण कमी करण्यासाठी जात आहे. हे चित्र बदलण्याची नितांत गरज आहे. सर्वच शहरांतील कमी जास्त प्रमाणात स्थिती सारखीच आहे. तरूणांना काय हवे हे पालक म्हणून आणि त्या वयातून मार्गक्रमण केल्यामुळे आपले कर्तव्य आहे.
तरूण पिढीला मानसिक ताणातून बाहेर आणण्यासाठी विपश्यना, शांततामय आणि निरोगी वातावरण, तणावांंचे निरासन, बौद्धिक शांतता आणि प्रगल्भता निर्माण करणारी केंद्र निर्माण करण्याची गरज आहे. ग्रंथालय, अभ्यासिका, विधायक माहिती देणारी गार्डन, पर्यटनस्थळे, निसर्गरम्य आणि रमणीय ठिकाणे निर्माण करण्याची नितांत गरज आहे. काही समाजसेवी संस्था जरी काम करत असल्या तरी त्याचे स्वरूप मर्यादित आहे.
उज्ज्वल भवितव्य घडविण्याच्या दृष्टीने आपण जाणकरांनी विचार करण्याची गरज आहे. निसर्गाच्या सानिध्यात ध्यान धारणा करून हा ताण-तणाव कमी होऊ शकतो, जेथे १०० टक्के शुध्द हा असेल, निरागस आनंद असेल, शांततामय वातावरण असेल, आपलेपण असेल. तरूण पिढीला हे देण्यासाठी आपण पुढाकार घेण्याची गरज आहे. ती घेऊयात!
नवनाथ मोरे
जिल्हा उपाध्यक्ष
एस.एफ.आय.
- 9921976460