शिवाजी विद्यापीठातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश परीक्षा अर्ज सुरु

कोल्हापूर : पदवीप्राप्त झालेल्या आणि शिवाजी विद्यापीठामध्ये विविध विभागामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्यांना कळविण्यात येते की, विद्यापीठ अनुदान आयोग, युजीसी नवी दिल्ली योजनेअंतर्गत एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस (नॉन क्रिमीलेयर) व अल्पसंख्याक (मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, आणि जैन) आणि खुल्या गटातील विदयार्थ्याकरिता शिवाजी विद्यापीठ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश परीक्षा अर्ज मागविण्यात येत आहेत.

Advertisement
Shivaji University, Kolhapur, suk

सदर अर्ज व परीक्षा सूचना शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थ्‍ळावर (www.unishivaji.ac.in) युजीसी सेंटर फॉर कोचिंग फॉर कॉम्पेटिटिव्ह एक्झामिनेशन्स्‍ वर उपलब्ध्‍ आहेत. तसेच अर्ज केंद्राच्या कार्यालयात उपलब्ध्‍ आहेत. दि 22 ऑगस्ट 2024 पासून दि 28 ऑगस्ट 2024 पर्यन्त प्रवेश अर्ज आवश्यक कागद्पत्रासहित केंद्राच्या कार्यालयात सकाळी 10:20 ते सायं 6:00 या कालावधीमध्ये जमा करावेत प्रवेश परीक्षा दि 31 ऑगस्ट 2024 रोजी सायं 3:00 ते 4:30 या वेळेत ऑफलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, मानव्यशास्त्र इमारत, शिवाजी विद्यापीठ येथे घेण्यात येईल याची नोंद घ्यावी.

संपर्कासाठी नं (0231-2609371)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page