CSMSS येथे “एक तास श्रमदान, महा स्वच्छता अभियान” संपन्न

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून आणि संस्थेचे सचिव पद्माकरकाका मुळे यांच्या प्रेरणेतून आज छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या आयुर्वेद, दंत, कृषी, अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आलेले आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने “एक तास श्रमदान, महा स्वच्छता अभियान” आजपासून सुरू केलेले आहे या योजनेचा शुभारंभ संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख, कृषी महाविद्यालयाचे संचालक डॉ दत्तात्रय शेळके, दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ लता काळे, अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ उल्हास शिंदे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ गणेश डोंगरे, कृषी महाविद्यालय प्राचार्य डॉ प्रवीण बैनाडे, मानवसंसाधन अधिकारी अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील, महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक सौरव घोरपडे, जनक हरणे, शेषराव वाघमारे, सुभाष वाघमारे, भाऊसाहेब भवार तसेच उपप्राचार्य डॉ जयश्री देशमुख, डॉ देवेंद्र भुयार, डॉ विश्वास कदम, अतुल भोंडवे, चंद्रशेखर राहणे, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी तसेच महापालिकेचे अधिकारी, सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com